यातना
यातना
हेवे दावे हे कशाला?
किती या यातना मनाला.
प्रेम आहे म्हणतोस ना मग,
अबोला हा कितपत धरावा.
बोलून तर तू घाव केलेस मनावर,
आता का उगा मलमपट्टी जखमेवर?
नाही समजले तुला कधी,
सांग कसे सिद्ध करू प्रेम माझें शपथेवर.
रुसतोस ही तू अन अबोल ही राहतोस.
मग का हा भांडणाचा खोटा आरोप माझ्यावर?
मीच दिसते ना रे तुझ्या गहिऱ्या डोळयात,
मग भावनांचा हा लपंडाव हवा कशाला?
नाही राहू शकत तू ही दूर माझ्या पासून,
का उगा मग हा मस्त राहण्याचा देखावा कशाला?
परतून ये पुन्हा आहे तिथेच मी थांबलेली.
प्रेम माझं तुझं आहे जन्मभराच,का हा मग खटाटोप दूर राहण्याचा?
प्रेमात नसतात रे हेवे दावे,इथे फक्त भावना वसतात.
माझ्या सारखा तू ही तडफडतो आहेस,अजून किती यातना देणार या मनाला?