यालाच प्रेम म्हणतात का?
यालाच प्रेम म्हणतात का?
तुझ्यासाठी अविरक्त झुरण आणि
फक्त तुझाच विचार करत राहणं
सांग ना ग सखे यालाच प्रेम म्हणतात का?
तुझ्या आठवणीत रात्रभर जगणं
वेड्यासारखं तुलाच आठवण
सांग ना ग सखे यालाच प्रेम म्हणतात का?
तूच आहे विश्व सगळं
असा भास घेऊन जगणं
सांग ना ग सखे यालाच प्रेम म्हणतात का?
दिवसरात्र फक्त तुझ्यातच गुंतून राहणं
आठवण येताच गालातल्या गाळात गोड हसणं
सांग ना ग सखे यालाच प्रेम म्हणतात का?
तुला समोर पाहताच बोलण्याचे शब्द हरवणे
आणि फक्त तुलाच पाहत राहणे
सांग ना ग सखे यालाच प्रेम म्हणतात का?
तहान भूक सारं सारं हरवण
अंगात दहा हत्तीचं बाळ आल्यासारखं वाटण
सांग ना ग सखे यालाच प्रेम म्हणतात का?
जग जिंकल्याचा भास होणं आणि
आठवून तुला सतत आनंदीत राहणं
सांग ना ग सखे यालाच प्रेम म्हणतात का?

