याल तर या रे लागें । अवघे माझ्
याल तर या रे लागें । अवघे माझ्
याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥
आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥
हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥२॥
तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥३॥
