अनुभवाचे रस देऊं
अनुभवाचे रस देऊं
अनुभवाचे रस देऊं आर्त्तभूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥1॥
देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥
आधीं भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥2॥
तुका म्हणे ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥3॥
