न गमे न गमे
न गमे न गमे
न गमे न गमे न गमे हरिविण ।
न मगे न मगे न मगे मेळवा शाम कोणी गे ॥1॥
तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा ।
दिसती दिशा ओसा वो ॥ध्रु.॥
नाठवे भूक तान विकळ जालें मन ।
घडी जाय प्रमाण जुगा एकी वो ॥2॥
जरी तुम्ही नोळखा सांगतें ऐका ।
तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥3॥
