अमृत अव्हेरें
अमृत अव्हेरें
अमृत अव्हेरें उचळलें जातां ।
विष आर्त्तभूतां आवश्यक ॥१॥
आदरासी मोल नये लावूं केजें ।
धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ध्रु.॥
खयाचिये अंगीं आपणे चाली ।
लावणी लाविली काय लागे ॥२॥
तुका म्हणे चाडे करा वेवसाव ।
आम्हासी तो वाव धीर आहे ॥३॥