STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

या संसारी संसारी...

या संसारी संसारी...

1 min
142

किती गुरफटतो आपण या संसारी,

 पाय निघत नाही येणार असून माघारी.


मन ओढावते दूरवरच्या लेकी सुनात,

 जीव अडकतो घर दार आणि व्हरांड्यात.


असतो किती आपण या नात्यांच्या आहारी,

 माझी आई माझी ताई माझीच नाती सारी.


वाहती आसवे नयनी घेता निरोप साऱ्यांचा,

 कमी पडू लागतो वेग मना सुसाट वाऱ्याचा.


गुंततो किती आपण आपल्याच अंतरी,

 चढतो ना कधी आपण ही मंदिराची पायरी.


जाणती ना सुखं दुःखं कोणी कोणाची,

 राहिली नाही जाणीव आपल्या कर्तव्याची.


किती गुरफटतो आपण या संसारी,

 पाय निघत नाही येणार असूनही माघारी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy