STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Others

3  

Rohit Khamkar

Tragedy Others

व्यवहार

व्यवहार

1 min
199

तू चुकलास की सगळं चुकतं, जाणीव होते उशिरा.

चणचण पैशांची सर्वांना असते, त्या शिवाय चालतो का हा पसारा.


तुला मांडताना बिथरलो, तर खूप होते परेशानी.

महिना अखेर येताच, खिश्यावर येते आणिबाणी.


गरज पाहून खर्चा, बाकी जमवा हळूहळू.

ऐनवेळेला हात मग पसरेल, वाटेल आयुष्य सोडून पळू.


कामी येते भविष्या, एक एक पै आणि छदाम.

बऱ्याच गोष्टी कामी येतील, कामे पूर्ण होतील तमाम.


तुझं आणि माझं नातं, अगदी योग्य असलेल बरं.

जवळीक किंवा दुरावा अती, झेपणार नाही पूरं.


तुझ्या ताळमेळा विना, आयुष्यात माजेल हाहाकार.

आनंदी जीवन करण्या, चांगलाच असू द्या व्यवहार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy