STORYMIRROR

Pavan Pawar

Action Children

2  

Pavan Pawar

Action Children

व्यथा

व्यथा

1 min
82

काय सांगू व्यथा माझ्या मनाची,

मुलांच्या पाठीवर ओझे बघता डोळ्यात धार येथे पाण्याची.

पाऊल उचलत नाही पुढे, पण पुस्तकाचे ओझे वाहतात,

पालकांच्या महत्त्वकांक्षासाठी आपले बालपण हरवतात.


कधी कळणार यांना कुरघोडी खेळण्याचा आनंद,

गावाच्या स्मशानात जाऊन झाडी लावण्याचा छंद.

नदीवर पोहताना कधी मातीचा बंधारा बांधतील,

पायात काटा रुतल्यावर काट्यानेच काटा काढतील.


मामाच्या पत्राचा खेळ यांना कळणार का?

उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची मजा आहे घेणार का?

उन्हाळी सुट्टीत देखील अभ्यासाचा मार बसते,

निष्पाप जीवांचे बालपण इथेच हरवते.


भाषेचे ज्ञान संस्कृती जागविते,

विदेशी भाषेला इथे भर मिळते.

पुरोगामाच्या नावावर बिन बुडाची शिक्षण शोभणार का?

असंस्कृत शिक्षणाचा व्यक्ती सुज्ञ नागरिक बनणार का?


इतिहासाचे धडे किंवा विज्ञानाची प्रचिती भुगोलाचा अभ्यास त्याच्या यशाची पायरी बनते,

भाषेचे ज्ञान गणिताची जाणीव त्या पायरीचे शिखर बनते.

शास्त्राच्या अभ्यासाने समाजात वावरण्याचे ज्ञान प्राप्त होते,

प्राथमिक शिक्षणच व्यक्ती बनविण्याचे कारण बनते.


शिका शिकून खूप मोठे व्हा पण लक्षात असू द्या,

भाषेविना तुमचे शिक्षण जास्त काळ जगणार नाही.

विज्ञानाच्या नावावर संस्कृतीशी खेळणार तर,

मनुष्य म्हणून तुमचे अस्तित्व जास्त काळ टिकणार नाही.                


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action