STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy

व्यथा बळीराजाची हो...

व्यथा बळीराजाची हो...

1 min
179

अन्नदाता सुखी भव:

साऱ्या जगाचा पोशिंदा

बळीराजा तुला म्हणे

तुझा झालाय रे वांदा


काळ्या मातीत राबतो

कष्टकरी हा पुतळा

उभा राहे दिन-रात

जपे हिरवा सोहळा


करी मशागत फार

जणू लेकरु मानून

शिवारास जपती हो

तेल डोळ्यात घालून


काय सांगू मी व्यथा ही

माझ्या बळीराजाची हो

पाणी रक्ताचं करुनी

भाव कवडीमोल हो


कधी येईल सुखाच्या

राशी त्याच्या जीवनात

मिळो त्याच्या मुलाबाळां

बरकत आयुष्यात


लेकरास नको आता

त्याच्या क्रूर वनवास

थांबविसी आत्महत्या

हेची रे गाऱ्हाणे खास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy