व्यक्तिस्वातंञ्याचा अतिरेक
व्यक्तिस्वातंञ्याचा अतिरेक
व्यक्तिस्वातंञ्याचा अतिरेक
आधुनिकतेचे वाहता वारे
व्यक्तिस्वातंञ्यास महत्व आले
संस्कार मातीमोल ठरले
तडजोडीस साऱ्यांनी नाकारले
अतिपैसा येता ऐषोरामासाठी
दुरावली माणसे पोकळ होती नाती
संसाराची रथचक्र ऊधळुन जाती
मनोमनी वाढता अहंमपणाची रुंजी
एकेरी पालकत्व गल्लोगल्ली वाढले
स्ञी सक्षमीकरण अतिशय झाले
बालपण कोवळे यातच होरपळले
ना माय ना धड पित्याचे छञ भेटले
समायोजन सामंजस्य कधीच हरवले
नकोसे एकलेपण अकाली वृध्दत्व लाभे
सुख सुख शोधता शोधता
मानवाची ओंजळ रिती करुन गेले
