STORYMIRROR

Shila Ambhure

Romance

3  

Shila Ambhure

Romance

व्याधी प्रेमाची (षडाक्षरी रचन

व्याधी प्रेमाची (षडाक्षरी रचन

1 min
1.1K


भासते मजला

मीच माझी नवी?

मंद धुंद जुई

का वाटते हवी?


का वाटतो हवा

एकांत अबोल?

मनी उठतात

का तरंग खोल?


उडे उंच नभी

होऊनि पाखरू

मन बेलगाम

कशी गं आवरू?


वारा हा खट्याळ

छेडितो पदरा.

गुलाब टपोरा

चुंबितो अधरा.


भोवती पांगले

मोरपंखी रंग.

येता समोर तू

मोहरते अंग.


पाहता दर्पनी

गाली येई लाज.

प्रीतरोग झाला

उमगले आज


मन माझे आता.

माझे न राहिले

तुजसाठी प्रिया

सर्वस्व वाहिले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance