Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Sabale

Tragedy Others

2.0  

Rajesh Sabale

Tragedy Others

वयाची साठी झाली

वयाची साठी झाली

1 min
1.1K

आता वयाची साठी झाली, किती करावे कोणासाठी|

हातात येता काठी अपुल्या, कोणी येतो आधारासाठी||

किती कमावल किती गमावलं, दिल घेतल नाही|

तुमच्या नसता काही बायको पोरही पहात नाही||

होईल जेंव्हा खिसा रिकामा, वर करतील आपलेच हात|

छाती पोटावर ठेवून हात, सारे सोडून जातील एक साथ||

खिशात असता पैसा अडका गाव सार, लागतय पाठी|

हातात येता काठी अपुल्या, कोणी येतो आधारासाठी||

दोन्ही टिंगरावर ठिगळ, अन फाटकी चड्डी होती कमरेला||

दारिद्र्यात रुबाब होता पर, फटका सदरा होता अंगाला||

तरुणपणी जवानी होती तेंव्हा पोटभर मिळाल नाही|

सुकतात झाड, गळतात पान, वळून जरा माघारी पाही||

म्हणतात जेव्हा असतात शीत, तेंव्हा भूत ही लागते पाठी|

अन प्रेमाचा देखावा करून वरती, मग घरचे ही घेतात भेटी||

किती जमवल्या बंगले अन माड्या, किती जमवल धन|

आयुष्याची संध्याकाळी तुला बघायला इथ येतय कोण||

संसाराच्या सारीपाटाचा, माणूस खेळत असतोय खेळ|

कस्तुरीसाठी मृग धावतो, तसा फुकट जातोय सारा वेळ||

चतकोर खावी भाजी भाकरी, आल्या टीचभर पोटासाठी|

जमून ठेव बाकी माणसा ती, माणुसकी ही आपल्यासाठी||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy