STORYMIRROR

Anjana Karnik

Inspirational

2  

Anjana Karnik

Inspirational

वसा

वसा

1 min
41

छोटयाने इवलं रोप लावलं 

वाढवलं , जपलं निगुतीने 

दोघांचे जग छान बहरलं 

घरावर छत्र धरलं झाडाने


छोटू वाढू लागला जोमानी

फांदी कापून बॅट बनवली 

नावं झालं खेळातील यशानी

जुनाट घराची बंगली झाली...


झाड सुखावलं, फळू लागलं

तरुण छोटूच वाढतं कुटुंब

उंच टॉवरच स्वप्न पाहिलं

नको वाटलं झाड अगडबंब

उपटून फेकायला यंत्र आलं


फांद्या,खोड, मुळं उपटली

पक्षांची इवली घरटी तुटली

सुखसावली ही संपून गेली

आजो आजी मिटून गेली


झाड नाही वसा विसरलं

दूर पसरलेलं मुळ जगलं

टॉवर शेजारी वाढू लागलं

आपला धर्म नाही विसरलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational