STORYMIRROR

Anjana Karnik

Inspirational

4  

Anjana Karnik

Inspirational

प्रकाशवाटा

प्रकाशवाटा

1 min
327

प्रथम गुरू असे माता 

जीवना देते आकार 

बाळाचा मार्ग चुकता

वागे निर्धाराने कठोर 


बोटं पकडूनी आईचे

लेकरू जाई शाळेत

क्षण जरी हे रुदनाचे

चित्र सुंदर भविष्यात  


गिरवता श्री गणेशा

प्रगतीशी जडते नाते

गुरू दावे ज्ञानदिशा 

सांगे आपणा ठावे ते 


पुस्तकातील अक्षरे

तारे जसे गगनातील

प्रयोग पाढे पाठान्तरे

किती थांबे मार्गातील


सारे बालपण सरते

ज्ञानवृक्षाच्या छायेत

दिशाज्ञान हाती पडते

मार्ग शोधण्या जगात 


रोप संस्काराचे लावे

गुरू हा माळ्यासम

सतचारित्र्य घडावे 

त्यातून उंच वृक्षासम


नवानुभव क्षणोक्षणी 

 गुरू ज्याचा त्याचा

मार्ग दावे जीवनरणी

अर्थ उमजता त्याचा


मार्ग नवा उजळतो 

जागताच आत्मभान

दीप भक्तीचा तेवतो

मुक्ती ही समर्पणात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational