STORYMIRROR

Anjana Karnik

Inspirational

3  

Anjana Karnik

Inspirational

तिरंगा

तिरंगा

1 min
163

माझ्या देशाचा सन्मान आणि आमचं दैवत!

पण....

स्वतंत्र्याच्या सत्तरी नंतर

मिळालाय त्याला पूर्ण सन्मान,

देशाचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीत

अगणित सैनिकांच्या बलिदानानंतर!


याचं तिरंग्याच्या सन्मानार्थ कधी 

कुमार बाबू गेनूनी झेलल्या होत्या गोळ्या छातीवर 

 आणि

झालाय अजरामर... इतिहासाच्या पानात आणि आमच्या मनातही!


शाळा घर दार कुटुंब सोडून शाळकरी पोरं..

हाच झेंडा उंच नाचवत, चालली होती

लाठ्या खात गावोगावी लोकनायकाच्या मागोमाग!


निळ्या नभाच्या रंगावर लहरतोय आज दिमाखात

तीन रंगाचं सौंदर्य आपल्यात सामावून!


दर स्वातंत्र्य नि प्रजासत्ताक दिनी

माझे वडील श्रद्धेने पूजायचे घरात ! 

ज्याच्या गौरवासाठी त्यांनीही सोसला होता तुरुंगवास 

लहान शाळकरी वयात!


या ध्वजात आहे पवित्र्य

धवलतेचं

अंगावर विराजलंय निळं चक्र प्रगतीचं

माथ्यावर झळकतोय भगवा रंग त्यागाचा

आणि निसर्ग पूजनाचा

संदेश किती मोलाचा त्यातील हरीत पट्ट्याचा!


विविध जाती धर्म पंथाचे 

करोडो जन बांधून ठेवलेत या राष्ट्रध्वजाने एकत्र


मग का बरं असे  दिसतात राष्ट्रीय दिनानंतर 

तिरंगे झेंडे कुठेही पडलेले सर्वत्र


या स्वतंत्र देशाचं हे प्रतीक देत राहो 

बालगोपालांना संधी 

प्रगतीची 


कधी वेळ न येवो त्यांच्यावर फाटक्या कपड्यात उन्हातान्हात

नाक्या नाक्यावर झेंडे विकायची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational