STORYMIRROR

Anjana Karnik

Tragedy

2  

Anjana Karnik

Tragedy

खंत

खंत

1 min
81

आज मज हाकारती ही हरवलेली माणसे 

रात्र टक्क जागी व्यर्थची टाकतो उसासे

सुख दुःखाचे जाताना ती सोडून गेली ठसे

एकटाच उरे कळेना, मी जगतो तरी कसे//

हरवली का माणसे.......


पार केली किती वादळे, वाटले ते यशमाझे 

हरवलेल्या माणसाविना सुखाचेही ओझे

हुंगता आठवाची फुले गंध भासती ताजे

अवेळी पुसून का गेलीस स्वप्न माझे तुझे?/

हरवली का माणसे......


बालपणीचे मैत्र माझे होते आनंदाचे मळे

उल्हास, ऊर्जा, सुखाचे निर्मल होते तळे

एकेक करून कोण कुठे निघून का गेले

आता शोधतो मी ते चित्र जे पुसूनी गेले//

हरवली का माणसे.......


सुखं दुःखाच्या प्रवाही होते काही किनारे

तप्त झळात तेव्हाही झाले शीतल वारे

अशांत रात्रीतील काही स्नेहल शांत तारे

हरवलेल्या माणसानो पुन्हा परतुनी या रे//

हरवली का माणसे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy