STORYMIRROR

Anjana Karnik

Others

2  

Anjana Karnik

Others

असा मी

असा मी

1 min
34

मी भोगत आलो

सारे

अन कुरकुर केली नाही

नच स्वार्थाचेही वारे

मज कधी लागले काही//


मी आस सुखाची धरली

ना हाती काही 

आले 

मी श्रद्धां माझी जपली

अन कित्येक मोह

पुसले //

 

मी तेव्हा फांदी 

झालो 

ते छायेसाठी

आले 

मग आनंदाने

न्हालो 

हे जीवन कामी

आले //


मी वाचनानंद

घेता 

हा जन्म पुस्तकी गेला

वर सरस्वतीने 

देता 

मज हातात शब्द आले//


हा निरोप आता

घेतो

मम श्वास सुखाचे झाले

या देहा धरेस देतो

मी रोपाचे रुप

ल्याले//


Rate this content
Log in