STORYMIRROR

Anjana Karnik

Others

2  

Anjana Karnik

Others

कालारूढ

कालारूढ

1 min
82

सदैव पुलकीत वृत्तीचे ते

पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे


अनंत काल साहित्य क्षितिजी

आहेत बुलंद खडे


पु. ल च्या साहित्यकृती 

जनास अति आवडे


अजूनही वाजतात त्यांचा

विनोदाचे चौघडे


फिकी वाटती कितीक

रत्ने महाराष्ट्र भूषणापुढे 


वाचत जाता साहित्य त्याचे

अधिकच आवडे


निखळ निर्मळ विनोदाचे

भरले त्यांनी अनंत घडे


सामान्यातील असामान्य

बहुतची त्याना गमले


व्यक्ती अन वल्ली मधुनी

साकार तयाना केले


त्यानी बोलावे नि आम्ही हसावे

असेच होत गेले 


या जगण्यातील ताणाचे

आम्हा विस्मरण व्हावे 


बटाट्याच्या चाळीमधुनी

आपुलेही जगणे दिसावे 


अनाम दातृत्वाचे कार्य 

त्यांचे निधनोत्तर कळले


मऊ लोण्याहून मार्दव

त्यांचे स्पर्शून राहिले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन