STORYMIRROR

Anjana Karnik

Classics

3  

Anjana Karnik

Classics

दर्शन

दर्शन

1 min
130

पावसाच्या सरीमधून शीळ आली

 ढगाआडून हसली मूर्त सावळी 

लख लख वीज चमकत राहिली

मागे विद्युलता मुक्ताई दिसली


झरझर धारा कोसळत्या धरेवर

वारकरी दिंड्या दिसल्या वाटेवर

हिरवीकंचं तुळस झोकात डोईवर

भक्त धाव घेई चंद्रभागे तिरावर


शिवारी बळीराजा उभा पाण्यात 

तरारती भात रोपं लावे चिखलात

मोत्याची नक्षी टपोरी पानापानात

सूळसूळ मासोळ्याही ओहोळात


घरट्यात चिडीचूप्प बसती पक्षी

मोर सुखाने जलधारात नाचती

 रानात डरावं डरावंची वाढते गती

इंद्रधनुच्या दर्शनाने नेत्र सुखावती


ओल्यादिसात लेकीस धाडू सांगावा

श्रावणझुला आता झाडाला टांगावा

बहीण भावाच्या भेटीचा योग यावा

रोजचा गोड नेवेद्याचा बेत करावा


रानावनात वाऱ्याचं नर्तन चाले

डोंगरानी झऱ्याचे घुंगरू बांधले

विहरी तळ्यात जल सुखं साचले

धरतीचे चित्र छान रंगीत झाले



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics