STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

व्रत मंगळागौर

व्रत मंगळागौर

1 min
454

देवी मंगळागौरी, पूजिते मनोभावे ।।

सुख शांती समृद्धी देवी आम्हांसी द्यावे ।।धृ।।


श्रावण मासी येते व्रत मंगळागौर

आया बाया करिती नवा साज शृंगार 

तयांच्या उत्साहाला अनुमोदन द्यावे

सुख शांती समृद्धी देवी आम्हांसी द्यावे ।।१।।


उठून प्रातःकाळी शुचिर्भूत होउनी

स्वच्छ सडा सारवण रांगोळीही काढुनी

स्वागत आहे देवी माझ्या अंगणी यावे 

सुख शांती समृद्धी देवी आम्हांसी द्यावे ।।२।।


धूप, दीप, आरती नैवेद्यही शोभतो

गौरी शंकर जोडा, चौरंगी विराजितो

पूजा साग्रसंगीत, पूजन स्वीकारावे ।

सुख शांती समृद्धी देवी आम्हांसी द्यावे ।।३।।


कुंकवाच्या धन्याला मिळो मान सन्मान

अखंड सौभाग्याचे, माते, दे वरदान

घुमती बाया, त्यांच्यासवे तुही नाचावे

सुख शांती समृद्धी देवी आम्हांसी द्यावे ।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational