Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

वर्षा

वर्षा

1 min
162


आले काळे मेघ गगनी 

चढला पाऊसाचा जोर 

त्याच्या नित्य येण्याने 

केले डोंगर हिरवेगार 


त्याच्या सुखद स्पर्शाने 

झाडे,वेली बहरले 

पक्षी,प्राणी सुखावले 

मुक्त न्हाऊन निघाले 


पसरली हिरवी हिरवळ 

चारापाणी मिळे पोटभर 

धरती मातेच्या कुशीत 

निजती शांत रात्रभर  


नाही उद्याची चिंता 

नाही भविष्याची भ्रांत 

सुखी,समाधानी जीवन 

त्यांची जगण्याची शिस्त 


वरदान त्यांना सृष्टीचे 

तिन्हीं ऋतूंचा आगर 

पोटापाण्याची नसे चिंता 

निसर्ग देई भरपूर  


नसे त्यांना कधी हाव 

नाही वाईट विचार 

त्यांच्या शुद्ध आचरणाने 

जीवन झाले सुंदर साकार 


त्यांनी माणूसकी जपली 

आपली प्राणी,पक्ष्यांत 

संघभावना त्यांच्या रक्तात 

धाऊनी येती संकटात 


नाही धनाचा लोभ 

नसतो द्वेष,मत्सर 

लुटे आनंद जीवनाचा 

भव्य मनाचा सागर 


शिकणे त्यांचे धरतीचे 

शिक्षण सुंदर सृष्टीचे 

आळसी जीवन वाईट 

बोध मिळे अनुभवाचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational