STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy Others

3  

Ashok Shivram Veer

Tragedy Others

वर्ष...

वर्ष...

1 min
110

मित्र सगे सोयरे 

सारेच कसे हरवून गेले,

आपल्याच धुंदीत हे 

वर्ष असे संपून गेले.


अजूनही आमचे स्वप्न 

असे हे अधुरेच राहिले,

तरीही वर्ष हे नाही 

आमच्यासाठी थांबले.


कोणी निवृत्त झाले 

तर कोणी गेले सोडूनी,

सरले वर्ष अन 

उरल्या त्या फक्त आठवणी.


होईल सुरुवात उद्या 

अशी ही नववर्षाची,

करूया पूर्णता मग 

साऱ्याच स्वप्नांची.


कधी देवू असा हा 

बुडत्याला काडीचा आधार,

अन मनोमनी मानू त्या 

भाग्य विधात्याचे आभार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy