वर्ष 2020
वर्ष 2020
विसरणार नाही असा वर्ष
स्मरणात राहील सदा हा वर्ष
बंद झाला एकमेकांचा स्पर्श
हरवला लोकांच्या चेहऱ्यावरचा हर्ष
कधीच विसरणार नाही असा वर्ष
चव नाही घेतला आईस्क्रीमचा
घोट पिला नाही कोल्ड्रिंक्सचा
सर्दी खोकल्याच्या काळजीने
रस पिला नाही कोण्या फळ्याचा
गरम पाणी पिऊन संपला वर्ष
कधीच विसरणार नाही असा वर्ष
लग्न सोहळा झाला कमी लोकांत
अनेक समारंभ झाले कमी लोकांत
कोणाच्या मातीला जाणे झाले नाही
तेरवी देखील झाली कमी लोकांत
अनेकांचे संपर्क तोडणारा ठरला वर्ष
कधीच विसरणार नाही असा वर्ष
बायका गेल्या नाहीत आपल्या माहेरा
कोणी आले नाही कोणाच्या दारा
घरातल्या घरात झाले सण साजरा
कोरोनाने वातावरण दूषित केला सारा
सणांचे महत्व सांगून गेला वर्ष
कधीच विसरणार नाही असा वर्ष
झुक झुक रेल्वे धावलीच नाही
धुरळा उडवित बस पळाली नाही
आकाशातून विमान उडाली नाही
माणसं घरातून बाहेर पडली नाही
चार भिंतीच्या आड संपले वर्ष
कधीच विसरणार नाही असा वर्ष
रस्ते सुमसान नि प्रदूषणमुक्त झाले
पाखरे आकाशात स्वच्छंद उडाले
पशु-पक्षी मोकळा श्वास घेऊ लागले
माणसं एकमेकापासून दूर झाले
माणुसकी शिकविणारे ठरले वर्ष
कधीच विसरणार नाही असा वर्ष
बंद झाली दारे प्रार्थनास्थळाची
ओढ लागली लोकांना दर्शनाची
उणीव भासली सुट्यात सहलीची
जेवण करू शकले नाही हॉटेलाची
घरातच खाऊन पिऊन संपले वर्ष
कधीच विसरणार नाही असा वर्ष
