STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy Inspirational

3  

Deepali Mathane

Tragedy Inspirational

वृक्षांचे उपकार

वृक्षांचे उपकार

1 min
247

भेगा पडे धरणीला 

ओलावा नसे मातीला

रानातून पक्षी गेले 

कुणी नसे साथीला

    तहानले जनावर

    भेग पडे मनावर

    मुक्या त्या जनावराला

    कोरड आली घशाला

निसर्गाचा प्रकोप हा

अशांत करि मनाला

झाडाविना पाणी नाही 

ही शिकवण सर्वाला

    म्हणून झाडे लावा हो

    ऐकून सकल टाहो

    पाणी बरसेल तेव्हा 

    वृक्ष बहरतील जेव्हा 

वृक्षांचे अगणित न

उपकार फिटणार

एक व्रुक्ष लावूनच

म्हणा डोळे मिटणार

    घ्या हा वसा हाती

   वृक्ष संगोपन करू

    बहरवून अवघी

    धरा जपू कल्पतरू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy