वृध्द
वृध्द
कधी प्रेमाने माझ्या जवळ येतात
तर कधी एकटे टाकून दूर जातात
कोणी आजोबा तर कोणी म्हातारा
जसे वाटेल तसे मला आवाज देतात
थकलो शरीराने मन आहे अजून तरुण
शिकवले मुलांना दिवसरात्र कष्ट करून
आता डोळ्यात पाणीच उरले फक्त कारण
"काय केलं तुम्ही?" म्हणून हाकलतात घरून
आज अनुभवाची शिदोरी घेऊन फिरतोय
तरीही जीवन जगण्यासाठी बघा झुरतोय
बघितली सारी दुनिया आणि तिचे रंगही
आता भक्तिरंगात रंगण्या सत्संग करतोय
या वृध्द काळात मी माझे बालपण आठवतो
जीवनभर मिळालेल्या आठवणींना साठवतो
सुख-दुःख, प्रेम द्वेष , मान अपमान सर्व काही
क्षणभंगुर जे , ते हृदयात मी शांतपणे गोठवतो
