वृद्धाश्रमात आई
वृद्धाश्रमात आई
तुझ्या भावी भविष्याचा अता आधार नाही मी
तुझ्या स्वप्नात अंगाई पुन्हा गाणार नाही मी
फुलांनी मोहरावा रे सुखी संसार दोघांचा
तुम्हा दोघांमध्ये आता कधी येणार नाही मी
तुझ्या बाळास पाहू दे असा हट्टा नको पेटू
तुझा रे वेळ कामाचा पुन्हा घेणार नाही मी
तुझ्या नावे करावी तू मला शेती मिळालेली
तुला मागून घे काही कुठे जाणार नाही मी
जरी मेले तरी आता नको येऊ इथे बाळा
तुला आजार कोरोना कधी देणार नाही मी
