STORYMIRROR

Prashant Kadam

Classics

2  

Prashant Kadam

Classics

वृद्धाश्रम काळाची गरज ?

वृद्धाश्रम काळाची गरज ?

1 min
1.0K

वृद्धाश्रम काळाची गरज


वृद्धापकाळी काय करावे ?

कसे रहावे कसे जगावे ?

खरच प्रश्न आहे गहन

विचार ही होत नाही सहन


सद्य स्थितीत दिसते गरज

फक्त वृद्धाश्रमाची खरच

म्हातारपणी पर्याय एकच

वृद्धाश्रमाचे पाहिजे कवच


चौकोनी ह्या राम रगाड्यात

प्रत्येकाची स्वप्ने असतात

स्वता: खेरीज जगच नसत

अप्पलपोटी मग मन बनत


जो तो आपल्या कामात मस्त

धकाधकीच्या जीवनात व्यस्त

दिसत नाही आई आणि बाप

मुले नाते विसरतात साफ


जर्जर आईबाप नाही चालत

भार त्यांचा नाही पेलवत

वेळ नसतो साधे बोलण्यास

दूरच राहे ऐकण्याचा हव्यास


पीढी दर पीढी पडते दरी

संस्कार चांगले घडले तरी

दोष मुलांचा नसेलही मुळी

समाजव्यवस्थेचे आहेत बळी


आई बाप एकाकी पडती

असून मुले नातवंड सोबती

कठीण वाटे प्रत्येक दिवस

संपून जाई जीवनाची हौस


अंगाखांद्यावर ज्यांना खेळवल

त्यांनीच जर उघड्यावर टाकल

बोलायला ज्यांना शिकवल

त्यांनीच जर बोलायच टाळल


मग अशा नाजुक प्रसंगी

वृद्धाश्रम वाटे खरा उपयोगी

समवयस्कांची मिळते साथ

आधारा मिळती अनेक हात


दुःख वेदना होती विभाजित

आनंद उत्साह होतो द्विगुणीत

मिळता समदुखी: अन् वयस्क

भार हलका होतसे अपसुक


जावा वृद्धापकाळ मजेत फार

न पडता मुलांवर भार

तर त्यासाठी नकोत परिश्रम

फक्त शोधा निसर्गरम्य वृद्धाश्रम


वृद्धाश्रम ही काळाची गरज

पर्याय नाहीत त्याला सहज

वाटला जरी हा अभिशाप

आनंदी जीवन जगतील आईबाप


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics