Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Ranjana Khedkar

Tragedy Classics


3  

Ranjana Khedkar

Tragedy Classics


🌹सल क्षणांची🌹

🌹सल क्षणांची🌹

1 min 145 1 min 145

क्षण आठवणीतले, बंद चाकोरीतले 

गतकाळी विरले, उन्हाळे पावसाळे 

दुःखाचे उबाळे, क्षणात लोपवीती 

आठवांचे वारे, मनी उत्सवांचे सोहळे... 1


रंगला, चांगला हा खेळ या जीवनाचा 

वाढलाय आता जवाबदारीचा पसारा 

जीवनी येणाऱ्या प्रत्येक वळणावर 

एकटाच पडलाय हा जीवं बिचारा... 2


बालपणीचं निरागस हास्य, दडलं चिंते मागे 

अर्ध्या भाकरीत अर्ध आयुष्य सरलं 

तारुण्याची मौजमस्ती, समाजाच्या गस्ती 

सर्व लाज काळजीच्या त्या मातीत मुरलं... 3


मातृत्वाचा मग लेवून, शेला सुखाचा 

मुलांचं भवितव्यास ,तडजोडीचं जाळं विणलं 

स्वप्नांच्या समीधा, हवनकुंड जीवनाचं 

समाधानाचं अजुनी ,ना रहस्य उलगडलं... 4


अर्धांगिनी होऊन, आधारवड मी संसाराचा 

सुखाचं, आशेच पाणी मी डोळ्यात भरलं 

सुख दुःखाच्या शर्यतीत चाले द्वंद्व मनात 

कधी अश्रू बनून गाली ओघळला आनंद... 5


Rate this content
Log in

More marathi poem from Ranjana Khedkar

Similar marathi poem from Tragedy