STORYMIRROR

प्रा.मोहन रसाळ

Classics

3  

प्रा.मोहन रसाळ

Classics

आला श्रावण माझा

आला श्रावण माझा

1 min
228

सरला आषाढ काल

आज श्रावण आला

ऊन पावसात आज

नभी इंद्रधनू फुलला


हंगाम पेरणीचा झाला

पीक तरारलं भुईवर

थोडी मिळाली उसंत

साजिरं करण्या सणवार


ऊन पावसाचा नभी

चाले नित्य लपंडाव

निळ्याशार कागदावर

इंद्रधनुचा चाले सप्तरंगी डाव


सर्जा राजास माझ्या

बहरे हिरवा शिवार

पीक डोलती शेतात

पाहून डोळ्या सुख अपार


माय म्हणती माझी

आला आला ग श्रावण

जप तप पूजा अर्चा

सार करावं आपण


येईल हंगाम कापणीचा 

थोडी मिळाली उसंत आता

करून पारायण नामजप

जमवू थोडे पुण्य आता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics