निशाण भगवे
निशाण भगवे
इतिहासाची साक्ष देते
भगवे निशाण माझे
स्वराज्याचे स्पप्न साकारले
छञपती शिवराय माझे
उच्च नीच ना भेद होता
हिंदवी स्वराज्यात कोणाचा
जात धर्माच्या पलीकडे होता
केवळ एक राजा स्वराज्याचा
हिंमत नव्हती गोऱ्यांची
विरोधात जाण्याची
वचक असा स्वराज्याचा
शान असे भगव्याची
कित्येक शाह्या आल्या गेल्या
कधी न झुकला भगवा माझा
स्वातंत्र्याची साक्ष देतो
भगवा झेंडा माझा
स्वातंत्र्याची मेढ रोवली
छत्रपती शिवबा माझा
तख्त पालटताना गोऱ्यांचे
कधी न डगमगला हुतात्मा माझा
जहाल मवाळ सारे लढले
उद्देश एकच स्वातंत्र्याचा
अभिमानाने आजही फडकतो
तिरंग्यात भगवा स्वराज्याचा
