वर आकाश निळे निळे...
वर आकाश निळे निळे...
वर आकाश निळे निळे
झाकाळून डोंगर
सोनेरी किरण रवीचे
पडले शिखरावर
निळा रंग तो आकाशी
व्यापुनी राहिला....
अरुणोदय होताच सारा आसमंत उजळला.....
हसली फुलेवेलीवर
ओठ उघडून
डो लल्या कळया मुक्या
डोळे मिटून.
करवंदीच्या जाळीवर
फुले पांढरी नाजूक
काट्यांचे अस्तित्व विसरून
फेर धरला साजूक
पायथ्याशी गिरीच्या पसरलेली
हिरवीगार झाडी
त्या झाडीतून दिसते आहे
कौलारू घरांची एक वाडी
