वादळ
वादळ
एका क्षणात होत्याचे नव्हते होते...
अनेकांची घरेदारे, संसार बेचिराख करते.
अशी एक नैसर्गिक आपत्ती येते.. तिचे नाव वादळ असते.
वादळ कुठूनही घोंगावतं......
नखशिखांत लपेटत
घुसमटत राहतं आत मनात पण.......
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैवानांच्या आसुरी सुखासाठी
आयुष्य हेच एक वादळ.
तीळ तीळ मरण उपभोगणारा तो जीव उध्वस्त.
चिघळणारी जखम.
वाहवत ठेऊन
पोटातलं ओठात न येण्याची असाह्य धडपड
होईपर्यंत जीवनाचा अस्त.
दूर लोटतात नाती - गोती
खोट्या प्रतिष्ठेच्या नावात
विकृत पैसेवलांच्या सुखासाठी राहिलेल्या शरीरावर सुद्धा अत्याचार.
जीवाच्या आकांताने मनातल्या पोटात खुप आगपाखड होते
अत्याचाराविरुद्ध
बेंबीच्या देठा पर्यंत ओरडून सुद्धा. जन समजते अशुद्ध.
सावरता सावरता शरीर कधीच कोसळते
वेदनेच्या वादळात एक धडपड विसावते एक धडपड विसावते.....
माझ्या सगळ्या रसिक वाचक मित्र-मैत्रिणींनो कविता वाचल्या बद्दल खूप खूप आभार . तुम्हाला कशी वाटली ही कविता नक्की कळवा. like , ]
