प्रेरणा
प्रेरणा
जगण्यासाठी धडपड होते.
अंधारात चाचपडत होते
आशेचा किरण पाहत होते
सहानूभूतीला शोधत होते
शून्याचा आकार दिसला
आकरातून ओंकार दिसला.
जीवन व्यथांचा पाठ वाचला
भवितव्याचा मार्ग दिसला.
अनेक व्यथा जमल्या होत्या.
अनेक कथा थांबल्या होत्या.
अखेर सारे तयार झाले.
मन मंदिरात निनाद घुमले.
प्रेरणेचा सुंदर धवलगिरीवर
प्रयत्न हा उगवे भास्कर
पवित्र मंगल प्रकाश पसरीत
माझे जीवन गेले उजळत
