STORYMIRROR

Shilpa Desai

Others

3  

Shilpa Desai

Others

वादळ

वादळ

1 min
249

एका क्षणात होत्याचे नव्हते होते.

अनेकांची घरेदारे, संसार बेचिराख करते.

अशी एक नैसर्गिक आपत्ती येते

तिचे नाव वादळ असते.


वादळ कुठूनही घोंगावतं...

नखशिखांत लपेटत

 घुसमटत राहतं आत मनात

पण.......

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैवानांच्या 

आसुरी सुखासाठी आयुष्य हेच एक वादळ.

तीळतीळ मरण उपभोग णारा तो जीव उध्वस्त.

चिघळणारी जखम वाहवत ठेऊन पोटातलं ओठात न येण्याची

असह्य धडपड होईपर्यंत जीवनाचा अस्त.

दूर लोटतात नाती - गोती खोट्या प्रतिष्ठेच्या नावात     

विकृत पैसेवलांच्या सुखासाठी राहिलेल्या शरीरावर सुद्धा अत्याचार.

जीवाच्या आकांताने मनातल्या पोटात खुप आगपाखड होते    

अत्याचाराविरुद्ध बेंबीच्या देठापर्यंत ओरडूनसुद्धा जन समजते अशुद्ध.

सावरता सावरता शरीर कधीच कोसळते वेदनेच्या वादळात एक धडपड विसावते.


Rate this content
Log in