बाबा तुमची आठवण येते.
बाबा तुमची आठवण येते.
झोप न डोळा या क्षणी येते
खरच बाबा तुमची आज आठवण होते.
तुमचे बोट धरलेलं बालवय आठवते
सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण मनात साठवते.
झटणारे ते अंतःकरण
माझ्या प्रत्येक श्वासात आहे
बाबा...... तुमच्या वात्सल्याची नित्य आठवण होते.
साहले जे कष्ट तुम्ही
लेकरांच्या सुखासाठी
भरवला घास मुखी
आज उणीव भासते.
रात्री पापणी मिटते
बाबा तुमची स्मृती येते
भरून आलं मन
डोळा पाणी पाझरते.
मंद झुळूक वाऱ्याची अवचित येते
पडलेलं पांघरूण ओढून देते
पावलांची चाहूल उशापाशी थांबते
न बोलता मायेने
थोपटत राहते
तुमचे अदृश्य भास
आसवे डोळ्यातील फुसते.
डोई हात फिरवीता
नयनी माझ्या झोप येते.
