वो अफसाना जिसें....
वो अफसाना जिसें....
प्रेम करुनी जीव जोडलां,
तुझ्या मनाचा ठाव घेतलां...!
नदी किनारी साद घालूनी,
खूप खेळलों पाठशिवणी...!
गुढ हसणें खळी ती गालीं,
केस कुरळे चंद्र कपाळी...!
वाट पाहणें मनी झुरणें,
या रेतीवर नाव कोरणें...!
असें चाललें शितल वारें,
का अचानक संशय धरें ...!
किती किती तें प्रश्न सारखें,
एक होवूनी झाले पारखें...!
भयाण शांती उरी वेदना,
प्रेम शाश्वत परीकल्पना...!
त्या वचनांची करून मोळी,
इथे ठेविली वळणावरीं...!
आज घेतलां श्वास मोकळा,
तुझा नि माझा मार्ग वेगळा...!
