STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

वंशाचा दिवा

वंशाचा दिवा

1 min
213

त्यानं अन् तिनं असंही जीवाचं रान केलं,

प्रेमानं लेकरांना साऱ्या मोठं केलं.

सुरेख परिवार असा नवरा बायकोचा,

अन होता गोजिरवाण्या त्या लेकरांचा.

वंशाचा दिवा अचानक सोडून गेला,

त्यासाठीच तर सारा अट्टाहास केला.

आणली घरात अशी सवत सोबतीला,

वंशाच्या दिव्यासाठी पाच पोरी

संगतीला.

कोणी उडाल्या तर कोणी बुडाल्या,

वंशाच्या दिलव्यानं दोन्ही आया सोडल्या.

विधवेचा टिळा लावला माथी नशिबानं,

अर्ध्यावरती डाव सोडला कारभाऱ्यानं.

दिवसा मागून दिवसही चालले,

तोंडावर नाही पण मागे बोलू लागले.

नाही का मुलांपेक्षा मुलगीच बरी,

तीच तर असते अपेक्षेविना दौलत खरी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy