वळून पाहता आयुष्यकडे....
वळून पाहता आयुष्यकडे....
वळून पाहता आयुष्याकडे.
मलाच माझे पडले कोडे.
खरी आताची ही मी.
की कालची होते ती मी.
न खचता लढत राहिले.
प्रत्येक संकट उंबऱ्यातच थोपवीले.
किती खाचखळगे भरून काढले.
कित्येक क्षण हळवे ही निभावून नेले.
शेवटी माझ्या संसारी मी भरून पावले.
वळून पाहता आयुष्याकडे आता मी आणखी कणखर जाहले.
