STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Others

4  

sarika k Aiwale

Romance Others

वळणावर पाऊस होता

वळणावर पाऊस होता

1 min
213

त्या वळणावर तो पाऊस

आज पुन्हा एकदा वाट तिच चालता 

वळणावर आठवणीचा सडा पडला

वेचता गंध तो श्वास हा गहिवरला 

त्या वळणावर आसवात पाऊस न्हाला .. 

आज पुन्हा एकदा वाट तिच चालता

खुणवती या पाऊलखुणा मजला 

अबोल भावनांचा झरा हा वाहिला 

त्या वळणावर संगे पाऊसही रडला 

आज पुन्हा एकदा वाट तिच चालता

क्षणिक आभास मनात का रुजला

सोबतीस नभाच्या मनी भाव गुंतला 

त्या वळणावर सखा पाऊस भेटला

आज पुन्हा एकदा वाट तिच चालता 

चिंब पावसाळी सरी ओल्या झेलल्या

मनाच्या कुपितली सल अश्रूत वाहिल्या 

त्या वळणावर तो पाऊसही दुखावला 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance