STORYMIRROR

Supriya Devkar

Romance

3  

Supriya Devkar

Romance

वळीव

वळीव

1 min
281

तुझ्या दिसण्याला कोणाची 

दृष्ट नको लागू दे 

तुझ्या असण्याने मला 

रात्रीत साऱ्या जागू दे 


फूलतील कळ्या हसण्याने

पेरतील गोड मधुकण 

तुझ्या सोबतीत वाहू दे

ओसंडून माझे मन 


तुझ्या प्रीतीचा वळीव

 मज आज होऊ दे 

चिंब चिंब तुझ्या सवे 

मज आज भिजू दे


विसरू दे भान वयाचे 

खळखळून हसू दे 

पुन्हा पुन्हा नव्याने 

तुझ्या प्रेमात मज फसू दे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance