STORYMIRROR

Sarika More

Tragedy

3  

Sarika More

Tragedy

विवाह घटिका

विवाह घटिका

1 min
10

झाले वय विवाहाचे, सुरु आगमन पाहुण्यांचे

चालू कार्यक्रम बघण्याचे, जुळेल नाते दोन जिवांचे

बघता बघता पसंती झाली, विवाह सोहळ्याची घटिका आली

देणे घेणे मंडप पंगत, पाहुण्यांची गर्दी झाली

सुरुवात झाली नवंजीवनाची, मन एकाचे तिथे लागेनां 

संसार कसा पडेल पार हा, काय करावे दुसऱ्यास कळेनां 

मोडून तोडून वर्ष संपले, वाद आणखीच पेटले

नाते निभावण्या एकाने, काळीज वेदनेशी जोडले

धुंद एक स्वतःचमध्ये, भानं नां त्यासं सोबतीचे

रेशीमधागे तुटले आता, विखूरले नाते अंतरीचे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy