वितुष्ट
वितुष्ट


नातं पानाफुलांचं अन् झाडांचं,
जरी वाटतं की अतूट आहे.
वरवर दिसे जरी अलबेल सारं,
पण विधात्या मनी वितुष्ट आहे..!
कधी पानगळ कधी फळगळ,
कधी फुलांचा तो मोहोर आहे.
नाजूक कळ्या चिरडण्यासाठी,
बागेत भुंग्याचा पण वावर आहे..!
कळी उमलण्यापूर्वीच कधी,
पानगळ का झाडांची आहे.
आभाळमाया लाभत नाही,
फुलाकळ्यांची का आबाळ आहे?
कुठे बहर पानांफुलांचा जरी असे,
वांझपण कोण्या फांद्याशी आहे.
तरी सावली देऊन दुसऱ्यांना,
झळ उन्हाची ती सोसते आहे.!
न्याय सर्वांना तो म्हणे देतो सारखा,
त्याच्यासाठी जरी सारे समान आहे..!
पण कळत नाही या मनास माझ्या,
झाडा झाडात का असमतोल आहे?
#गंगाशिवकापुत्र