Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

4  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

*विषय:- पुस्तक प्रेमी*

*विषय:- पुस्तक प्रेमी*

1 min
352


पुस्तक प्रेमी असणं खरोखरच

वाटतं अभिमानास्पद मला |

नको व्यर्थ भटकणं बाष्कळ

बडबड पुस्तकां सोबत मी भला | |१| |


ज्ञान,माहिती,मनोरंजनाचे पुस्तकं

असतात सहज सुलभ साधनं |

नाही लागत थांगपत्ता कुणाला हवं

तेव्हा हाती घेऊन सोपं वाचनं | |२| |


पुस्तकच कधीतरी नकळतपणे

शिकवतात मनन चिंतन करायला |

अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यास

लावतात लेखणीचे शस्र धरायला | |३| |


वाचाल तर वाचाल हे सांगतात

विद्वान ते आहे अगदीच खरे |

ज्ञान हा मानवाचा तिसरा डोळा 

अर्थ समजून घेतलेलाच बरे | | ४| |


रामदास स्वामी सांगून गेले लिहावे

दिसामाजी काही वाचावे सलग |

वेळ मिळेल तेव्हा उपलब्ध होतेच

साहित्य असतांना वाचक सजग | |५| |



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational