STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational Others

विषय:- निसर्गाची अमुल्य ठेव

विषय:- निसर्गाची अमुल्य ठेव

1 min
662

रंग सुंदर निसर्गाचे सा-यांना

कसे अनोखे वेड लावतात |

रंग मानव दाखवून स्वभावातनं

निसर्गातील वृक्षांना कापतात | |१| |


वेड लागले मला निसर्गाचे 

देई सौख्य समाधान दृष्टीस 

वेड लागले कृतघ्न मानवास

ओरबाडून घेऊ पाहे सृष्टीस | | २| |


ठेव निष्ठा जरा तरी करी जतन

निसर्गाचे या सृष्टीच्या भल्यासाठी

ठेव दिली अमुल्य निसर्गाने कराया

सांभाळ नको लागू भलत्यापाठी | |३| |


वाट वळणा वळणाची नागमोडी

जाई हिरव्या डोंगर दरीच्या मधून |

वाट पाहे सृष्टी सारी निसर्गाच्या

संतुलनाची मानवा घे समजून | |४


मान द्यावा निसर्गाला ठेवून भान

देतो किती आपणास भरभरून |

मान तुकवाया नको भविष्यातील

भीतीने ये अंगावर काटा सरसरुन | |५| |


वरील शामलाक्षरी काव्य प्रकारात रचना करताना निसर्गाची ठेव जतन करून मानवाने सृष्टीच्या संतुलनासाठी वृक्षांची तोड करू नये हे या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे!


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational