Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy

4  

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy

*विषय:- मोबाईल*

*विषय:- मोबाईल*

1 min
299


काय आला मोबाईल बाई झाली

डोकेदुखी सर्वांना कळेना काही |

मोबाईलच्या अतीवापरावर इलाज

काही केल्या सापडतच नाही | |१| | 


मोबाईल ने सा-याच जगावर

केलंय काय इतकं हे गारुड |

अगं विंचू चावला सारखंच संत

 एकनाथांचं होईल रचून भारुड | |२| |


मोबाईल आला हाती विसरले

सारे पुस्तक वाचन वर्तमानपत्र |

विसरले पत्रलेखन,मैदानी खेळ

अन् मोकळ्या गप्पांचे चर्चासत्र | |३| |


मोबाईलनं लहान मुलांना भयंकर 

केलं वेड जेवतांना असतात बघत |

अस्पष्ट दिसणं,अती वजन वाढणं

मोबाईलच्या वापरामुळे सतत | |४| |


मोठ्यांचा तर तो जीव कि प्राण

झालाय त्याच्यावीण तो अपूर्ण |

हरवत चालली आहे संपूर्ण पिढी

करते आहे मनःशांतीचे चूर्ण | |५| |


आधुनिक युगात त्याचा महिमा

वाढलाय खूप हे ही तितकेच खरे |

माफक प्रमाणात मोबाईल वापरच

भविष्यासाठी फायद्याचा बरे | | ६| |


मोबाईलच्या अतीवापराचे दुष्परिणाम सांगतांना त्याचा माफक प्रमाणात वापरच भविष्यात सा-या जगासाठी फायदेशीर ठरेल हेच विचार या कवितेतून व्यक्त केले आहे! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy