STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract Tragedy

3  

Suhas Bokare

Abstract Tragedy

विषकन्या उवाच

विषकन्या उवाच

1 min
285

मला विषात कोंडणे असायचे 

विषात रोज बांधणे असायचे


विषाक्त पोरगी जगास शाप मी 

तुझेच नेत्र चांदणे असायचे


तुझेच स्वप्न देखणे असायचे

तरी विभक्त भेटणे असायचे


मजेत मी तू भेटलो दिसे जरी

विषात युक्त डंखणे असायचे


उरात स्वप्न प्रेमही भरायचे!

तुझ्यात रोज नांदणे असायचे!


समांतरीच धावतील ती रुळं 

करार चाक रेटणे असायचे


रुळं दुरून भेटली दिसायची

असत्य तेच खेटणे असायचे


विषाक्त गान चाखुनी फसायला

अंगात आग पेटणे असायचे


गुलाब रोज जेवढे तुटायचे 

तुलाच त्यात वेचणे असायचे


विचारलेस 'काम काय द्यायचे' ?

विषाक्त रंग पोसणे असायचे


मनात फास साखळी विषातली 

उरात नाश पावणे असायचे


रसायनात पंखुडी विसावली~

तुझेच प्रेम मागणे असायचे


मलाच काय प्रेम ते कळायचे

विषास प्रेम पाजणे असायचे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract