STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

विसरले मी स्वतःला

विसरले मी स्वतःला

1 min
219


विसरले मी स्वतःला...

तुझ्या डोळ्यात विसरले मी स्वतःला,

हरवले जरी तेव्हा गवसले मी स्वतःला ...


आता छेडून गेला तो वारा स्वच्छंदी ,

कुणाच्या स्पर्शाने मोहरले मी स्वतःला...


साद माझी ऐकता प्रतिसाद तु दिला,

गुंज मनाची येता सावरले मी स्वतःला...


पराभव जरी माझा जिंकले तु मला,

हरून जिंकले समजावले मी स्वतःला...


ही काळीरात्र अशीच चांदण्यात नहावी ,

तुझ्या खांद्यावर विसावले मी स्वतःला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract