STORYMIRROR

Dinesh Kamble

Tragedy

3  

Dinesh Kamble

Tragedy

विरह

विरह

1 min
517

तुझा विरह साजणा

कशी सहन मी करू...

दूर राहुनी तुझ्या रे 

सांग कुठवर झूरू...? 


गेला दूरच्या देशा तू 

मला सोडुनी एकटी...

जीव गुंतला तुझ्यात 

जणू बोरीची रे काटी...


घालमेल मनातली 

बोल बोलू मी कुणाला...

तुझ्याविना ना राहिला 

अर्थ आता जगण्याला...


साज शृंगार करते 

रोज रोज तुझ्यासाठी...

तुला सवडच नाही 

राया माझ्या भेटीसाठी...


तुझ्या विरहात मी रे 

पूर्ण सोसला उन्हाळा...

नको असा सरायला 

सख्या औंदा पावसाळा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy