विरह वेदना
विरह वेदना
काळ्याभोर डोंगराने धरतीला घातला वेढा
प्रियकराची वाट बघून जीव झाला हैराण वेडा
व्याकूळ झाली ती विरहाने डोळ्यात पाणी,
मनात हुंदका वार्यालाही सुटला पाझर
न राहवून घातली शीळ धीर देत
कानात कुजबुज प्रिये हुंदका गीळ
चौफेर दाटले धुके धुसर प्रकाशात भासली आकृती
लटक्या रागाने जवळजवळ धावली ती
मनाचा खेळ, तिला घेतले कवेत चुंबिले ओठ
नकळत अश्रूंना करून दिली वाट
भानावर आली तेव्हा तसे नव्हते काही
विरहाने व्याकूळ झाली ती मन कावरेबावरे
विरहाच्या दुःखातून नाही सावरता येत रे
क्षणाक्षणाला नको घडवून आणू असा भास
सामावुन घे तुझ्यात, संपव विरहाचा प्रवास॥
